अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गुन्हा करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या इसमास तोफखाना पोलीसांनी सीताफीने जेरबंद केले आहे.तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
अहिल्यानगर शहरातील मिस्कीन मळ्यातुन निसार हॉस्पीटलकडे जाणा-या रोडलगत असलेल्या काटेरी झाडाजवळ एक इसम गुन्हा करण्याच्या हेतुने गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये तलवार घेवुन बसलेला आहे.अशी गोपनिय बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलिसांनी नमुद ठिकाणी सापळा लावुन एक इसम हातामध्ये गुलाबी रांगाचे कपडयामध्ये काहीतरी गुंडाळलेले दिसल्याने त्यास आहे त्यास आहे त्या परिस्थितीमध्ये ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बंटी प्रकाश शिंदे (वय 33 वर्षे, रा.तारकपुर,ख्रिश्चन कॉलनी,ता. जि अहिल्यानगर) असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1000/- रु किं.ची एक 27 इंच लांबीची लोखंडी पाते त्यास 5 इंच पकडण्यासाठी पितळी मुठ असलेली अशी एकुण 32 इंच लांबीची तलवार विटकरी रंगाची म्यान सह गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळलेली मिळुन आली.त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती नगर शहर विभाग,पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ भानुदास खेडकर,अहमद इनामदार,वसिमखान पठाण, सुमित गवळी,सतिष त्रिभुवन यांनी केली आहे.