अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दि.१९ मार्च २०२५ रोजी संपूर्ण सुरक्षा केंद्रांतर्गत स्टेक होल्डर,शासकीय विभागाचे प्रतिनिधी,तसेच स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी यांचे करिता चंद्ररूप डाकले जैन कॉलेज सभागृह श्रीरामपूर येथे संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक परदेशी व प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांचे हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी डॉ. दीपक परदेसी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अति जोखीम वर्तन असणाऱ्या व्यक्तींना नियमित समुपदेशन करून त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणणे गरजेचे आहे, आणि ते कार्य संपूर्ण सुरक्षा केंद्र मार्फत केले जात आहे.
युवा वर्गांमध्ये या माध्यमातून जनजागृती होत आहे हे विशेष. आरोग्य क्षेत्रातील सर्व संस्थांनी तसेच इतर सहभागींनी हा विषय सविस्तर समजून घेऊन आपला सहभाग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या काळात एच आय व्ही/ एड्स बद्दल अजूनही जनजागृती करणे गरजेचे असल्याचे नमूद करत या कार्यक्रमास महाविद्यालयाकडून नियमित उत्स्फूर्तपणे सहकार्य केले जाते, महाविद्यालयात असलेल्या रेड रिबीन क्लब मार्फत वर्षभरात विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाते असे सांगून उपस्थित सर्वांनी आजच्या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेऊन सर्व माहिती प्राप्त करून घ्यावी व त्याचा कार्यक्षेत्रात उपयोग करावा असे सांगितले. कार्यशाळेचा उद्देश आपल्या प्रास्ताविकात श्री शिवाजी जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी मांडला. ॲड.अरुण लबडे अध्यक्ष,बार असोसिएशन श्रीरामपूर,यांनी एच आय व्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017 च्या अनुषंगाने उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.उद्घाटन कार्यक्रमानंतर विषय सूचीनुसार सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत वेगवेगळ्या सत्राद्वारे सर्व वक्त्यांनी मार्गदर्शन केले.श्री सागर फुलारी यांनी संपूर्ण सुरक्षा केंद्राचे कार्य,संपूर्ण सुरक्षा केंद्राचे ध्येय,उद्दिष्ट,लक्ष लोकसंख्या कोर पापुलेशन संपूर्ण सुरक्षा केंद्र मार्फत कोणकोणत्या सेवा प्रधान केल्या जातात.संपूर्ण सुरक्षा केंद्राची आऊटरीच ऍक्टिव्हिटी, पेशंटचा फ्लोचार्ट,संपूर्ण सुरक्षा केंद्र धोरण,संदर्भ सेवा,सर्व शासकीय विभागांशी असलेला संपूर्ण सुरक्षा केंद्राचा संबंध याची माहिती दिली.
श्रीमती. सविता बेल्हेकर मॅडम यांनी एच आय व्ही एड्स मूलभूत माहिती दिली.श्री.शिवाजी जाधव , जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांनी एच आय व्ही आणि सिफिलीस च्या संक्रमणाचे निर्मूलन कसे केले जाते, प्राथमिक प्रतिबंध उपाय काय आहे.गर्भवती महिलांमध्ये सीफीलिसचे प्रमाण तसेच मातेकडून बाळाला धोका होण्याचे प्रमाण किती आहे याविषयी माहिती सांगितली. जिल्ह्यातील राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेले केंद्र व सेवा सुविधा इत्यादींची माहिती त्याचप्रमाणे विविध प्रकल्पाद्वारे होणाऱ्या कामाची माहिती सद्यस्थितीत जिल्ह्याचे प्रमाण व सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटी, तसेच त्वचा व गुप्त रोग बद्दल माहिती दिली. असंसर्गजन्य आजार व संसर्गजन्य आजार याबद्दल श्री प्रसन्न धुमाळ यांनी सविस्तर माहिती दिली त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्री.राकेश गायकवाड यांनी ART उपचार आणि उपचारातील सातत्य याबाबत मार्गदर्शन केले. संपूर्ण सुरक्षा केंद्राकडून इतर विभागाशी कसा संबंध येतो व संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या रुग्णांना काय सेवा मिळावी याविषयी संबंधित विभागाशी चर्चात्मक संवाद करण्यात आला.कार्यशाळेत संपूर्ण सुरक्षा केंद्र अंतर्गत स्टेक होल्डर, संस्था (TI), विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी व आरोग्य विषयक संबंधित कर्मचारी, समाज कल्याण विभाग, शासकीय योजना, तालुका बार असोसिएशन, महिला बालविकास, कुटुंब नियोजन विभाग,क्षयरोग विभाग,विहान प्रकल्प उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संपूर्ण सुरक्षा केंद्र समुपदेशिका सविता बेल्हेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग चे श्री.राधाकिसन पाटोळे , एकात्मिक सल्ला समुपदेशन तपासणी केंद्र टीम श्री.रोहन भांबळ,तसेच सी डी जैन महाविद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.