अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरात चेंनस्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपीस कोतवाली पोलिसांनी सिताफिने अटक केली आहे.त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये 8 डिसेम्बर 2024 रोजी चेंनस्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता.सदरील गुन्हा हा साजिद सलीम शेख व करण वाघेला (रा. काटवण खंडोबा टिळक रोड शेजारी) यांनी केला असल्याची खात्रीलायक माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले, दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तपास करत साजिद शेख याला पकडले,त्याने पोलिसांना माहिती दिली की हा गुन्हा करण वाघेला याच्या मदतीने केला आहे.चोरीतील सोने शहरातील एका सराफाकडे मोडले आहे असे आरोपींनी सांगितले असता पोलिसांनी सराफाकडे जात आरोपींनी मोडलेले सोने हस्तगत केले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,पोलीस अंमलदार विशाल दळवी,संदीप पितळे,दीपक रोहकले,तानाजी पवार,सुरज कदम,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,राम हंडाळ, सचिन लोळगे,मपोकॉ.नागरे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.