अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोपरगाव येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.22 मार्च 2025 रोजी कोपरगाव शहरामध्ये अग्निशस्त्र,हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अभिषेक सिंग हा पुणतांबा फाटा,ता.कोपरगाव येथे असून त्याचे जवळ विनापरवाना गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली.
पथकाने पंचासमक्ष नगर मनमाड जाणारे रोडवर, पुणतांबा फाटयाजवळ सापळा रचुन संशयीत इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अभिषेक उदयनारायण सिंग, वय 23, रा.टाकळीनाका,निवारा कॉर्नर,कोपरगाव,ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची अंगझडती घेऊन त्याचेकडून 30,000/- रू किंमतीचे एक गावठी पिस्टल, 200/- रू किं.एक जिवंत काडतुस असा एकुण 30,200/- रू.किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी विरूध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 150/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतुल लोटके, सोमनाथ झांबरे,रमीजराजा आत्तार,विशाल तनपुरे यांनी केलेली आहे.