अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मुकुंदनगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करुन विक्री करणा-यांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई केली आहे.दि.23 मार्च 2025 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांना गोपणीय माहिती मिळाली की,मुकुंदनगर भागात वाबळे कॉलनी शेजारी पार्किंगच्या पत्र्याचे शेडमध्ये एक ईसम गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांसाची विक्री करत आहे.
अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सहा. पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर यांनी कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक इसम गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करण्याकरिता स्वतःचे कब्जात वाळगताना मिळून आल्याने सदर ईसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सलोम मुसा शेख,रा. कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर असे सांगितले. त्याचेकडे मालकाबाबत व सदर शेड कोणाचे आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गोमांस हे 2) तोसिफ कुरेशी, 3) इर्शाद कुरेशी रा. नालबंद खुंट,मस्जिदमागे अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात 1,41,500/- रुपये किमतीचे गोमांस अंदाजे 700 किलो तसेच लोखंडी सत्तुर, चाकु व लोखंडी तराजू मिळून आल्याने त्यांचेविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.-178/2025 भा.न्या.सं.2023 चे कलम 271 सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 5(क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री. अमोल भारती,सहा.पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरिक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार अजय गव्हाणे,पांडुरंग बारगजे,दिलीप झरेकर,इस्माईल पठाण,समीर शेख,प्रमोद लहारे यांनी केली आहे.