संगमनेर तालुका प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):- शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तसेच मा.जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ गोडगे यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावात जिल्हापरिषद प्राथमिक शाळेची खोली मंजूर झालेली आहे.
चिंचोली गुरवचे सरपंच श्री.विलास अण्णा सोनवणे, उपसरपंच व सर्व सदस्य कमिटी यांच्या मागणीवरून मराठी शाळेसाठी हि खोली मंजूर झाली आहे.या उद्घाटन प्रसंगी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संपतराव गोडगे,सरपंच श्री. विलास अण्णा सोनवणे तसेच उपसरपंच व सर्व सदस्य आणि शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.