अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गोवा राज्य बनावट व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली विदेशी दारू अवैध मद्य वाहतुकीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1 ने नगर तालुक्यात वाळुंज फाटा बायपास जवळ सकाळ अजून रेल्वे पुलाखाली कारवाई केली आहे.
यात विदेशी दारू 302.4 ब.ली (35 बॉक्स) सह 1 चारचाकी असा एकुण अंदाजे रु.1306900/- किमंतीचा मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.सदरची कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री.प्रमोद सोनोने,उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री.प्रविण कुमार तेली,यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री.एस.आर.कुसळे,श्री.व्ही.एन. रानमाळकर सहा.दु.नि.जवान, सर्व श्री.सुरज पवार,देवदत्त कदरे,चतुर पाटोळे,दीपक बर्डे, सिद्धांत गिरीगोसावी,सुनंदा अकोलकर यांनी केली आहे
अवाहन
तरी जनतेस आव्हान करण्यात येते की,अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री संदर्भात कोणतेही माहिती अथवा तक्रार असल्यास 1800 2339 999 व व्हाटस ॲप क्र.8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा.