अहिल्यानगर (प्रतिनिधी):-रोड रॉबरीच्या गुन्ह्यातील जप्त असलेले 3 लाख 28.000/- रु किं.चा 4 तोळे सोन्याचा मुद्देमाल कोतवाली पोलीसांनी न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीस सुपूर्त केला आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1270/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6) प्रमाणे दि.04/12/2024 रोजी गुन्हा दाखल होता.या नमुद गुन्ह्यात फिर्यादी रितेश सुरेश पटवा (रा.साईनाथनगर पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर) हे त्यांचे कुटुंबासह दि.04/12/2024 रोजी मध्यरात्री पुणे ते पाथर्डी असे अहिल्यानगर मार्गे जात असताना त्यांना झोप येत असल्याने त्यांनी त्यांची इरटिगा चारचाकी गाडी ही हॉटेल कन्हैय्या समोर,नगर-पुणे रोड, केडगाव,अहिल्यानगर येथे उभी केली होती.त्यादरम्यान मध्यरात्री 04.00 वा.चे सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना झोपेतून उठवून गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगुन फिर्यादी यांची आई व पत्नी यांचे गळ्यातील सोन्याच्या दोन चैन त्यास पेंडल लावलेले असलेल्या दोन्ही मिळुन अंदाजे पाऊने सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे त्यांना लोखंडी कोयत्याने मारहान करुन बळजबरीने चोरी करुन नेल्या होत्या व त्यांचे कडील पल्सर दुचाकीवरुन पळुन गेले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.योगिता कोकाटे व पोलीस स्टाफने गुन्ह्याचे तपासात एकुन अनोळखी तीन आरोपींपैकी दोन आरोपी अटक केले.अटक आरोपी यांनी चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने ज्या सराफ व्यवसायीकास विक्री केले होते.त्या सराफ व्यवसायीकाकडुन 3,28,000/- रु किं.ची एक पिवळ्या रंगाची सोन्याचे धातुची लगड पेन्सील आकाराची तिचे वजन 39.860 मिली असलेली तिची गोल्ड शुध्दता 86.95 व कॅरेट 20.87 हे हस्तगत करण्यात आले असुन ते दि.02 एप्रिल 2025 रोजी मा. जिल्हा न्यायालय,अहिल्यानगर यांच्या आदेशाने फिर्यादी यांना सुपुर्त करण्यात आले असुन यावेळी फिर्यादी यांनी पोलीस विभागाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.