अहिल्यानगर (प्रतिनिधी)
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 41 वर्षे
▶️ **आरोपी (खाजगी इसम)* – अभिषेक दत्तात्रय जगताप, वय- 35 वर्ष, धंदा-खाजगी नोकरी, रा.शास्त्रीनगर, शेवगाव, ता. शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी*
7,000/- रुपये
दिनांक -04/04/2025
▶️ **लाच स्विकारली*
3,000/ रुपये
दिनांक -04/04/2025
▶️ **हस्तगत रककम* –
3,000/-रुपये
▶️ *लाचेचे कारण* तक्रारदार यांचे मालकीचे डंपर वाहन असून त्याने ते मुरूम वाहतुकीचे व्यवसाय करत होते. दिनांक 30/7/2023 रोजी सदर डंपरने मुरूम वाहतूक करत असताना शेवगाव पोलीसांनी तक्रारदार यांचे डंपर वाहन पकडून तहसिलदार शेवगाव यांच्याकडे पुढील कारवाई करतात दिले होते. त्यावेळी तहसिलदार शेवगाव यांनी दंडात्मक कारवाई करून तक्रारदार यांचे डंपर वर 2,36,300/- रुपयांचा दंड आकारला होता. सदरचा डंपर तहसिलदार शेवगाव यांनी लिलावात काढल्याने दि.25/03/2025 रोजी तक्रारदार यांनी चलनाद्वारे त्यांचे डंपर वरील दंडाची रक्कम 2,36,300/- रुपये भरलेले आहे. त्यानंतर तहसिलदार शेवगाव यांनी तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याकरीता आदेश होणे बाबतचे पत्र उपविभागीय अधिकारी, पाथर्डी भाग, पाथर्डी यांना दिले होते. तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याचा अंतिम आदेश मिळणेवर त्यांचे प्रकरण उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग यांचे कार्यालयात प्रलंबित आहे.खाजगी इसम अभिषेक दत्तात्रय जगताप हे तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याचे आदेश देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय,पाथर्डी येथील कारकून मोडसे मॅडम यांचे साठी 7500/-रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.03/04/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.04/04/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी (खाजगी इसम) अभिषेक दत्तात्रय जगताप यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याचे आदेश देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय,पाथर्डी येथील कारकून मोडसे मॅडम यांचे करिता 7,000/- रुपये लाचेची मागणी केली व त्यापैकी 3,000/- रुपये आज स्वीकारण्याचे मान्य केले. दि.04/04/2025 रोजी तहसिल कार्यालय शेवगाव येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी अभिषेक जगताप यांनी तक्रारदार यांचे कडून 3,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री. राजु आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8788215086
▶️ **सापळा पर्यवेक्षण अधिकारी**
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344
▶️ *सापळा पथक*
महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================