संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-वासुदेव म्हणजे अंगभरून पोशाख,हातात टाळ-चिपळ्या, डोक्यात विविधरंगी कवड्यांच्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप,कपाळी गंध,गळ्यात विविध देवतांच्या माळा,कमरेला बासरी असं हवंहवंसं वाटणारं देखणं रूप,ऐटदार पेहरावातील वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी गाणं म्हणत,दान मागत फिरताना पाहणं हा मन प्रसन्न करणारा अनुभव लोककलावंत वासुदेव संपत रामा गदाई यांच्या लोककलेतून संगमनेर शहरातील नागरिकांना येत आहे.संपत रामा गदाई,मु.पो.लोणी खुर्द,मापूरवाडी रोड,राहता, जिल्हा अहिल्यानगर,वय वर्षे 70 वडिलांचे नाव रामा गदाई तर आईचे नाव रंभाबाई रामा गदाई आहे.संपत रामा गदाई वयाच्या विसाव्या वर्षापासून वासुदेव ही लोककला सादर करत आहे. आपल्या वाढ वडिलांचा लोककलेचा पारंपारिक वारसा जपत आहे.
नाशिक,आळंदी,पंढरपूर,त्रंबकेश्वर,पैठण,श्रीरामपूर,संगमनेर यासारख्या शहरात निम शहरात,ग्रामीण भागात घरोघरी जातात.भल्या पहाटे उठून तयारी करून सकाळी सहा वाजता बस ने प्रवास सुरू करतात.शहरात अथवा गावात गेल्यानंतर तेथील दुकाने, घरोघरी जाऊन गाणे म्हणतात. वासुदेव या लोककलेच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन व जनजागृती करण्याचे कार्य करतात.वासुदेव ही लोककला काळाच्या ओघात लुप्त पावत चाललेली महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.परंतु त्यांचे मुले शिक्षण घेतल्यामुळे या लोककलेपासून दूर गेली आहे.त्यांचा नोकरी, व्यवसाय करण्याकडे कला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वासुदेव ही लोककला सादर करणारे लोक कलावंत संपत रामा गदाई यांच्याबरोबर दत्तू ओंकार गदाई,सुभाष सखाराम काळे हे रा. मु.पो.लोणी,तसेच छबु मोहन सुपेकर,अमोल रमेश सुपेकर राहणार कोपरगाव हे वासुदेव ही लोककला सादर करतात.म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतके वासुदेव नगर जिल्ह्यात सध्या ही लोक कला जपत आहे.
वासुदेव ही लोककला जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.शासनाच्या प्रयोगात्मक लोककला सादरीकरण योजनेअंतर्गत लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था,सेवाभावी संस्था,सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.शालेय विद्यार्थ्यांना वासुदेव या लोककलेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.वासुदेव या लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन जागृती मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते.शासकीय योजनांची माहिती वासुदेव हे घरोघरी,गावोगावी,गाव खेड्यात नागरिकन पर्यंत पोहचऊ शकतात.तसेच शालेय विद्यार्थ्यांन मार्फत वासुदेव ही लोककला जतन व संवर्धन मोठ्या प्रमाणात करणे सहज शक्य आहे.महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवा प्रसंगी तसेच इतर कार्यक्रमांमध्ये या वासुदेव लोककलावंतांना सहभागी करून घ्यावे. लोक कलावंत वासुदेव ही लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांना अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत आहे. वाढत्या महागाईच्या काळात दीड हजार रुपये महिना मानधनात उदरनिर्वाह करणे शक्य नाही. तसेच वासुदेव या लोक कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी वाढीव मानधन शासनाने द्यावे अशी मागणी कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे.