अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे सर 10 एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.10 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण होणार असून या प्रसंगी तें प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आमदार संग्रामभैय्या जगताप,पुतळा समितीचे सुरेश बनसोडे,तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली आहे.
तसेच अभूतपूर्व होणाऱ्या या कार्यक्रमास गायक आनंद शिंदे हे उपस्थित राहणार असून आपल्या गाण्यातून समाजाचे ते प्रबोधन करणार आहेत.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
