अहिल्यानगर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस अंमलदार यांना दि.5 एप्रिल रोजी गौरविण्यात आले.

त्यातच बेलवंडी पोलीस ठाण्याच्या मपोहेकॉ.सुरेखा लक्ष्मण वलवे यांनाही पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले. त्यांना कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले.यावेळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
