अहिल्यानगर (प्रतिनिधी):-माहिती तंत्रज्ञानातील इआरपी नेक्स्ट प्रणालीचा उपयोग करून सेवा क्षेत्रातील कामाचा वेग,अचूकता,गुणवत्ता, पारदर्शकता,परिणामकारकता आणि कार्यविस्तार सहजतेने साधता येतो.*ERP Next* या प्रणालीचे लोकार्पण शनिवार ,दि. 5 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे आयोजविण्यात आले आहे.

महामानव बाबा आमटे यांचे सहकारी आणि नागपूरच्या व्ही एन आय टी संस्थेतील प्रोफेसर डॉ.दिलीप पेशवे, नागपूर,अहिल्यानगर मधील ज्येष्ठ संगणक तज्ञ मुकुंद देशमुख,रिटेल वेअर कंपनीचे अजित थडानी हे यावेळी उपस्थित राहणार असल्याचे स्नेहालयाचे विश्वस्त शशिकांत सातभाई,अनिल गावडे आणि डॉ प्रीती भोंबे यांनी सांगितले.स्नेहालय मधील स्टोअर विभाग,परचेस विभाग, एचआर विभाग आणि अकाउंट्स या विविध विभागांना या तंत्रज्ञानाद्वारे एकत्र जोडले आहे.स्नेहालय अन्य सामाजिक संस्थांसाठी प्रशिक्षण आणि सक्षमीकरणाचा उपक्रम राबवते. या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग अन्य सामाजिक संस्थांना व्हावा यासाठी स्नेहालय प्रयत्नशील आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
संगीता सानप ( स्नेहालय जनसंपर्क अधिकारी ) 9011020178
