अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बॅटरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस कोतवाली पोलिसांनी शिताफीने मुद्देमालासह जेरबंद केले आहे.प्रेम जितेंद्र साठे (रा.केडगाव देवी अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या कडून 82 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले या करीत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या सपोनि. योगिता कोकाटे,मपोहेकॉ. रोहिणी दरंदले,संदीप पितळे विशाल दळवी,दीपक रोहकले, तानाजी पवार,सुरज कदम शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ,सचिन लोळगे, सोमनाथ केकाण,महेश पवार, सोमनाथ राऊत,मपोकॉ.प्रतिभा नागरे,दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंड यांनी केली आहे.