अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शिर्डी येथे गर्दीचा फायदा घेऊन चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील 2 आरोपीना सोनारासह ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 3 लाख 20,000/- रू.किमतीच्या मुद्देमालासह 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.फिर्यादी श्री.रामप्रसाद पुटुराव (रा.सेक्टर 54,रा.बेंगलोर,कनार्टक) हे श्री.साईबाबा पालखी मिरवणुकीमध्ये शिर्डी येथे असताना अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या गळयातील सोन्याची चैन बळजबरीने ओढून चोरून नेली.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 356/2025 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.08 एप्रिल 2025 रोजी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील नमूद जबरी चोरीच्या गुन्हयाचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अविनाश कुसळकर, रा.गांधीनगर,बीड याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता सदरचा आरोपी हा खरवंडी कासार,ता.पाथर्डी येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने खरवंडी कासार, ता.पाथर्डी येथे निष्पन्न आरोपी शोध घेऊन अविनाश अशोक कुसळकर, वय 20,रा.तलावडा रोड,गांधीनगर,ता.जि.बीड हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने आदित्य बोरकर, रा.राहुरी,जि.अहिल्यानगर याचेसह रामनवमी दरम्यान शिर्डी परिसरातुन गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागीने चोरी केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीकडे गुन्हयांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने आपसात वाटून घेतले.अविनाश अशोक कुसळकर याचे वाटयास आलेले सोन्याचे दागीने हे बीड येथील सोनार गौरव जोजारे यास विकल्याची माहिती सांगीतली.त्यानुसार सोनार गौरव सुनिल जोजारे,वय 23, रा.चंपावतीनगर,ता.जि.बीड यांना विकले आहे असे सांगितले. त्यांना नोटीस बजावण्यात येऊन त्याचेकडे विचारपूस करता त्याने विकत घेतलेले सोने हे चोरीचे असल्याचे माहित असलेबाबत माहिती सांगीतली.पथकाने ताब्यातील आरोपीने त्याचे साथीदाराबाबत सांगीतलेल्या माहितीवरून शोध घेऊन आदित्य दिपक बोरकर,वय 22, रा.तनपुरे गल्ली, राहुरी, ता.राहुरी,जि.अहिल्यानगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी आदित्य दिपक बोरकर यांची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातुन 3,20,000/- रू किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागीने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन त्यांनी केलेल्या गुन्हयांबाबत विचारपूस केली असता त्यांनी रामनवमी दरम्यान शिर्डी येथे केलेल्या गुन्हयांच्या माहितीवरून,शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हयांची पडताळणी करून आरोपीकडून शिर्डी पोलीस स्टेशनचे 2 जबरी चोरी व 2 चोरी असे एकुण 04 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/ तुषार धाकराव,पोलीस अंमलदार विश्वास बेरड,बिरप्पा करमल, फुरकान शेख,अरूण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे,जालींदर माने, रोहित येमुल,शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ,आकाश काळे यांनी केलेली आहे.