अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कृती आराखडा उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांचे संकल्पनेतुन एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत शेंडी चौक येथे पोलीस मदत केंद्र चौकीचे उद्घाटन आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.दत्तात्रय कराळे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले की,हे पोलीस मदत केंद्र नागरिकांसाठी 24 तास खुले असून या पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या समस्या सहजरित्या सोडविल्या जातील.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.संपतराव भोसले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर,शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.बाबासाहेब बोरसे,एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.माणिक चौधरी यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच शेंडी,पोखर्डी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.