सांगली (प्रतिनिधी):-सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने सातत्याने महागाई वाढविली आहे जीवनावश्यक वस्तूचे दर गगणाला भिडले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅसदर मध्ये मोठी वाढ करून भरीस भर घातली आहे.
ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढीविरुद्ध निषेध व आंदोलन करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसां दिवस वाढ होत चाललेली आहे.त्यातच जीवनावशक घरगुती वापरातील गॅस दर वाढूवून महिलांचे बजेट कोलमडले असताना एकीकडे योजनांची खैरात वाटायची व महागाई वाढवून दुसरीकडून पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधाऱ्यांचा चालू आहे याच्या निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिताताई जाधव,छाया जाधव,मिरज शहराध्यक्ष शारदाताई माळी,कुपवाड शहराध्यक्ष प्रियांका विचारे, सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ,मिरज शहर कार्याध्यक्ष चिंचणीकर,सांगली शहर उपाध्यक्ष स्नेहल चंदनशिवे, रूपाली हारगे,अनिता पाटील, अरुणा कांबळे,प्रतीक्षा खरबडे, फिरोजा जमादार,पूजा आवळे, प्रवीण फकीर,सविता धुलगुडे आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.