अहिल्यानगर (दि.2 मे प्रतिनिधी):-माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले.अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप,माजी जिल्हापरिषद सदस्य सचिन जगताप यांचे ते वडील होते.
ते नगर शहराचे नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोनदा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे अरुणकाका जगताप हे 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.शहरातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी धाऊन जाणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून अरुणकाका जगताप यांच्याकडे पहिले जात होते.त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.