अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्नेहालय संचलित बालभवनच्या वतीने ‘गोल गाईड’ या समाजोपयोगी आणि दूरदृष्टीपूर्ण इच्छुक स्वयंसेवक व विद्यार्थ्याचे फॉर्म भरून उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. “नाते…प्रेरणादायी मैत्रीचे ” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दीर्घकालीन आणि सुसंगत मार्गदर्शन, मानसिक आधार आणि प्रेरणा देणे हा आहे.

‘गोल गाईड’ हा एक वैयक्तिक मेंटॉरशिप उपक्रम असून गरजू समाजातील गरजू विद्यार्थ्यांना G – Guide (मार्गदर्शन करणे), O – Observe (निरीक्षण करणे), A – Assist (सहाय्य करणे) L – Lead (नेतृत्व करणे) असे या उपक्रमाचे मुख्य भाग असून स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे वैयक्तिक मार्गदर्शक, प्रेरणादाता आणि सहाय्यक बनून कार्य करतील.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. स्नेहालयाचे विश्वस्त राजीव गुजर, स्नेहालय अनिवासी विभागाचे संचालक हनीफ शेख यांनी उपक्रमाची संकल्पना सविस्तरपणे मांडली. समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये श्वेता गांधी, लीना मुथा, स्मिता बंथिया, गुणाली मुथा, बालभवनच्या मानद संचालक वैशाली चोपडा आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन केले. या कार्यक्रमात ५० इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शिक्षण, सामाजिक काम, करिअर मार्गदर्शनात रुची असलेले युवकांना सकारात्मक दृष्टी देण्याची इच्छा असलेले, संवेदनशील, समजूतदार व प्रेरणादायी स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. पहिल्या टप्प्यात बालभवनमधील ४० विद्यार्थ्यांना वैयक्तिक मेंटॉरशिप दिली जाणार आहे. संस्थेचे पालक राजीवभाई गुजर यांनी समाजातील संवेदनशील नागरिकांना या उपक्रमात वेळ देऊन योगदान देण्याचे आवाहन केले. इच्छुकांनी 9011026498 या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘गोल गाईड’ उपक्रम हा फक्त एक कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक संवेदनशील आणि परिणामकारक प्रवास ठरणार आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प उपस्थितांनी केला असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहे.
राजू पांढरे मो.91 99213 72738
