अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील नेप्ती येथील 7 हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून 475 लिटर गावठी हातभट्टी दारू व 3250 लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नमूद दिलेल्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.दि. 29 मे 2025 रोजी पथकाने नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी हातभट्टी अड्डयांची माहिती घेऊन छापे टाकुन कारवाई केली.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, विश्वास बेरड,अरूण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.