अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कत्तलीकरीता आणलेल्या गोवंशीय जातीच्या २५००० रू.किमतीच्या जनावरांची भिंगार कॅम्प पोलीसांनी सुटका करत जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.दि.06 जून 2025 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांना गोपणीय माहिती मिळाली की,आमिना मस्जिदच्या मागे ब्रम्हतळे रोड आलमगीर भागात दोन इसम गोवंशीय जातीचे जनावरे राहते घराचे भिंतीच्या आडोशाला निदर्यपणे दाटीवाटीने त्यांना चारा पाण्यासाठी वंचित ठेवलेले आहेत.अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सहा.पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर यांनी कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गोवंशीय जातीची जनावरे ही कत्तल करणे करीता राहते घराचे भिंतीच्या आडोशाला बांधलेले दिसले.
त्यावेळी दोन इसम पोलीस व पंचाना पाहुन पळुन गेले सदर ठिकाणी याबाबत विचारपुस केली असता सदरचे गोवंशीय जातीचे जनावरे त्यात एक पांढ-या रंगाची खिलारी गाय व दोन नर जातीचे खिलारी व गो-हे असे 1)राजु विठ्ठल जाधव रा. आमिना मस्जिदच्या पाठीमागे ब्रम्हतळे रोड आलमगीर.ता.जि.अहिल्यानगर 2)अन्वर उर्फ लंगड्या कुरेशी पुर्ण नाव पत्ता माहीत नाही.ता.जि.अहिल्यानगर यांची असल्याचे समजले.त्याचे ताब्यात एकुण 25,000/-रुपये किंमतीचे गोवंशीय जातीचे जनावरे ही महाराष्ट राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांनाही मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.-342/2025, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री. अमोल भारती,सहा.पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार दिपक शिंदे,रवि टकले,संदिप घोडके,प्रमोद लहारे,समीर शेख यांनी केली आहे.
