सराईत दुचाकी चोराच्या दोन मोपेड दुचाकीसह कोतवाली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून कोतवाली पोलिसांनी दोन मोपेड दुचाकी हस्तगत केल्या आहेत.दि.२ जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास भाजीपाला मार्केट,मार्केटयार्डअहिल्यानगर येथून तक्रारदार गणेश भैरुलाल कांकरिया (रा.गंजबाजार) यांची मोपेड दुचाकी (एमएच १६. डीडी ७१२३) चोरी झाली होती.

त्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल आहे.कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहितीचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी विजय अशोक लेंडाळ (वय २३ वर्षे, रा. उत्सळ दुमाला,ता.नेवासा) याने केल्याचे निष्पत्र झाले.याच प्रमाणे दि.३० मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आर्यन मोबाईल शॉप,वाडीयापार्क, येथून तक्रारदार अनिल दुर्गा जंगम (या रा.जंगमवस्ती, रेल्वे स्टेशन) यांची मोपेड दुचाकी (एमएच १६. डीई २८१६) चोरीला गेली होती.याबाबतही कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दि.६ जून रोजी आरोपीला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात नेवासा पोलिसांनी एमएच १६ डीडी ७१२३ या क्रमांकाच्या दुचाकीसह अटक केली.त्याने नगर शहरातून दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्याकडून चोरीची ६५ हजार रुपये किमतीची दुसरी दुचाकीही जप्त करण्यात आली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ धागें,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सपोनि योगिता कोकाटे,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पो.हे.कॉ.राजेंद्र औटी,पो.हे.कॉ. विशाल दळवी,पो.हे.कॉ.योगेश कवाष्टे,संदीप पितळे,म.पो.हे.कॉ.रोहिणी दरंदले,पो.कॉ.दीपक रोहोकले, तानाजी पवार,सोमनाथ केकाण, महेश पवार,सोमनाथ राऊत, सुरज कदम,सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडू यांनी केली आहे.
