अवैधरित्या धारदार तलवार बाळगणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव गुप्ता येथे विनापरवाना अवैधरित्या धारदार तलवार बाळगणाऱ्या 02 आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत जेरबंद केले आहे.

बातमीची हकीकत अशी की,एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे ओंकार सुनिल शिंदे (वय ३१ वर्षे रा.माळवाडी वडगाव गुप्ता ता.जि.अहिल्यानगर) हा वडगाव गुप्ता शिवारातील मोकळ्या मैदानात अवैधरित्या लोखंडी धारधार तलवार घेवुन फिरत आहे,यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे छकुली चौधरी यांनी पथक तयार करुन सदर इसमास वडगाव गुप्ता शिवारातील मोकळ्या मैदानातून ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ओंकार सुनिल शिंदे असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक धारधार लोखंडी तलवार मिळुन आली.

सदर तलवार त्याचेकडुन जप्त करण्यात आली आहेतसेच दि.०७ जून २०२५ रोजी दुपारच्या सुमारास सपोनि.चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे आदिनाथ देवराम तोडमल वय ३१ वर्षे रा.चापेवाडी जेऊरबायजाबाई ता.जि. अहिल्यानगर हा इमामपुर घाटात अवैधरित्या लोखंडी धारधार तलवार घेवुन फिरत आहे यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर इसमास इमामपुर घाट येथे ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदिनाथ देवराम तोडमल वय ३१ वर्षे रा. चापेवाडी जेऊरबायजाबाई ता.जि.अहिल्यानगर असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक धारधार लोखंडी तलवार मिळुन आली. सदर तलवार त्याचेकडुन जप्त करण्यात आली असुन दोन्ही इसमाविरुदध एमआयडीसी पोस्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक बी.चौधरी,पोसई.मनोज मोंढे, पोहेकॉ.थोरवे,पोहेकॉ.सुशांत दिवटे,पोहेकॉ.राजु सुद्रिक, पोहेकॉ.गणेश चौधरी,पोना.विष्णु भागवत,पोकॉ.भगवान वंजारी, पोकॉ.जयसिंग शिंदे,पोकॉ.सुरज देशमुख,पोकॉ.अक्षय रोहोकले, पोकॉ तांदळे यांनी केली आहे.