शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर पोलीस दलाल मध्ये एकच खळबळ उडाली असून शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी जयश्री सुद्रिक यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी यांच्या छळास कंटाळून सुद्रिक यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.ही घटना रविवार दिनांक 9 जून रोजी सकाळी घडली असून सौ.सुद्रिक या सकाळी 11.30 वा नेहमीप्रमाणे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ड्युटीसाठी आल्या असताना त्यांना त्रास जाणवू लागला त्यांना ड्युटीवर असणाऱ्या सहकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.