बोलेरो पिकअप चोरणारे दोघे भामटे जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बोलेरो पीकअप चोरणाऱ्या भामट्यास कोतवाली पोलीसांनी मुद्देमालसह जेरबंद केले आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.१० जून २०२५ रोजी फिर्यादी नामे अशोक गोरखनाथ बडे (वय ४० वर्षे रा.धंदा ड्रायवर रा.मेहेकरी गाव ता.जि.अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,मी व माझी पत्नी अर्चना बडे असे आम्ही दोघे आमचे बोलेरो पिकअप गाड़ी नं.एमएच १६ सीडी ८४०९ मधुन भाऊ संतोष बडे यांना भेटण्यासाठी श्रोदीप हॉस्पीटल अहिल्यानगर येथे आलो होतो. हॉस्पीटल समोर आल्यानंतर आम्ही आमची गाडी पार्किंगमध्ये लावणार तोच मला हॉस्पीटल मधून फोन आला की तुमचे पेशंट आर्जन्ट आवसीयु रुम मधुन शिफ्ट करावयाचे आहे.
तुम्ही लवकर या असे कळविल्याने मी व पत्नी असे आम्ही आमची गाडी घाई गरबडीत पार्किंगमध्ये लावली व आम्ही दोघे भाऊ संतोष बडे याचेकडे हॉस्पीटलमध्ये गेलो त्यांना आयसीयुमधुन सिप्ट केल्यानंतर मी व पत्नी सकाळी ११:१५ वाचे सुमारास गाडी लावलेल्या ठिकाणी पार्किंगमध्ये आलो असता आम्हाला आमची गाडी लावलेल्या ठिकाणी दिसून आलो नाही. तेव्हा लक्षात आले की, हॉस्पीटलमध्ये जाताना गडबडीत चावी गाडीलाच राहिलेली होती. मी आजूबाजूचे परीसरात माझे बोलेरो पिकअपचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही तथा माझी खात्री झाली की माझी महिंद्रा बोलेरो पीकअप किंमत अंदाजे ८,३०,०००/रू. हि श्रीदीप हॉस्पीटल अहिल्यानगर येथील पार्किंग मधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेलो आहे, वगैरे मा च्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं । ५४९/२०२७ योएनएम ३०५(य) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्ह्यातील आरोपी हा चोरीस गेलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप केज ता.केज जि.बिड येथे सदर चोरीतील महिंद्रा बोलेरो पीकअप पार्क करुन ठेवलेली आहे.अशी माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे मपोहेकॉ.दरंदले, पोको.दिपक रोहकले,पोकॉ. तानाजी पवार,पोकॉ.सुरज कदम,पोकॉ.सचिन लोळगे,पोकॉ.राम हंडाळ, सोमनाथ राऊत यांना कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सदर ठिकाणी पथकासह जावून सापळा लावून आरोपीत यांना ताब्यात घेवून त्यांस त्यांचे नाव गांव व पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव १) सिध्देश्यर आनंद घुले वय ३५ वर्षे रा.टाकळी ता.केज जि.बिड २)धनराज बजरंग घुले वय ३४ वर्षे रा. टाकळी ता. केज जि. बिड असे असल्याचे सांगीतले, त्यांस महिंद्रा बोलेरो पीकअप बाबत विचारपुस करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तर दिली त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप नंबर एमएच १६ सोडी ८४०९ हा चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर सदर बोलेरो पिकअपचा जागीच दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा केला सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हा मपोहेकॉ. १४६० रोहिनी दरंदले या करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाने केली आहे.