वैद्यकीय क्षेत्रातील नॅशनल सर्जन सप्ताहा निमित्ताने भव्य नॅशनल रक्तदान शिबिराचे आयोजन
आशा मोरे/कर्डक (नाशिक प्रतिनिधी):-वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रिया शास्त्र व भूलशास्त्र यांच्यामध्ये नवीन झालेले बदल…आणि सामान्य माणसातील शस्त्रक्रियांच्या भीती घालवण्यासाठी. असोसिएशन सर्जन ऑफ इंडियाच्या वतीने जुन 2025 चा दुसरा आठवडा.हा नॅशनल सर्जन सप्ताह संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला.नाशिक मध्ये देखील नाशिक सर्जन सोसायटी 2025 .26 च्या या उपक्रमात आठवड्याभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊन 15 जून हा नॅशनल सर्जन सप्ताह हा नाशिकच्या आय.एम.ए हॉल शालिमार येथे भव्य नॅशनल रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मारवाडी युवा मंच मिट टाऊन. व रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या संदर्भ रुग्णालय नाशिक यांचे या सामाजिक उपक्रमाला महत्वाचे योगदान लाभले. याप्रसंगी सामाजिक संस्थेमधील कर्मचारी अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स यांनी रक्तदान करून. नाशिक सर्जन सोसायटी च्या वतीने एक सामाजिक संदेश दिला आहे.या प्रसंगी. द असोसिएशन सर्जन ऑफ इंडिया चे महाराष्ट्र वैद्यकीय सर्जन सोसायटीचे अध्यक्ष डॉ नागेश मदनुरकर. सेक्रेटरी डॉक्टर अमित केले. जॉईंट सेक्रेटरी दिलेश भारंबे. ट्रेझरर डॉक्टर पराग धामणे. डॉक्टर यशवंत रहाडे डॉक्टर प्रवीण नारखेडे डॉक्टर शिल्पा दयानंद. यांच्यासह मारवाडी युवा मंच मीट टाउन नाशिक च्या अध्यक्षा रोशनी राठी. कोषाध्यक्षा शितल राठी. सेक्रेटरी निधी नावंदर. संयोजिका शिल्पा मुंदडा.सदस्या कंचन मुंदडा. प्रियंका समुद्र. रोटरी क्लब ऑफ नासिक गोदावरीच्या डॉक्टर मीनल पलोड. डॉक्टर मेघना नाठे. डॉक्टर विशाल पवार. डॉक्टर प्रतिभा बोरसे. जगदीश आचरा. ओमकार महावीर. रुपेश घटकरे.यांच्यासह वैद्यकीय क्षेञातील नामांकित सर्जन. शासकीय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते……