जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर प्रतिनिधी)

जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तब्बल 1 कोटी 2 लाख रू.किं.मुद्देमाल जप्त करून 42 जनावरांची सुटका केली आहे.
दि.17 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की,इसम नामे फिरोज रशीद शेख (रा.कृष्णानगर, घोडेगाव,ता.नेवासा व पापा कुरेशी,रा.आळेफाटा,ता.जुन्नर, जि.पुणे) यांनी मिळून फिरोज रशीद शेख याच्या राहत्या घराजवळ घोडेगाव येथे गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निदर्यतेने डांबुन ठेवले आहेत.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटनाठिकाणी काही इसम दोन ट्रकमध्ये गोवंश जिवंत जनावरे भरताना दिसून आले व एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेले असताना मिळून आले.पथकाने घटना ठिकाणावरून 1) निलेश रामकृष्ण शिंदे,वय 35, रा.उंबरगाव,ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर 2)शाहरूख शमशुद्दीन शेख,वय 25, रा.जुनी पेठ,घोडेगाव,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर 3)भारत भाऊसाहेब शहाराव, वय 36, रा.फत्तेपुर, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले व एकुण 1,02,90,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीकडे घटना ठिकाणच्या गोवंश जनावरांबाबत विचारपूस केली असता सदरची जनावरे 4) फिरोज रशीद शेख, रा.कृष्णानगर, घोडेगाव, ता.नेवासा (फरार) 2) पापा कुरेशी, रा.आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे जि.अहिल्यानगर पुर्ण नाव माहित नाही (फरार) यांचे मालकीची असून त्यांचे सांगणेवरून नमूद जनावरे ही कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपी मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहेत.पथकाने वर नमूद आरोपीविरूध्द सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 230/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग,श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,संतोष लोढे,बिरप्पा करमल,ज्ञानेश्वर शिंदे,अतुल लोटके,संदीप दरंदले,सोमनाथ झांबरे,आकाश काळे,बाळसाहेब रविंद्र घुंगासे व उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.