शहरातील नामांकित ‘त्या’ पत्त्याच्या क्लबवर एसपींच्या विशेष पथकाची कारवाई..लाखोंचा मुद्देमाल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात चालणाऱ्या अवैध पत्त्यांच्या क्लबवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकातील पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे व पथकातील पोलीस कर्मचारी यांनी 17 जून रोजी दुपारच्या सुमारास कारवाई केली.या कारवाईमध्ये पोलिसांनी 13 आरोपींना अटक करत 1 लाख रुपये रोख तर 16 मोबाईल चारचाकी असा एकूण 19 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी डीवायएसपी संतोष खाडे म्हणाले की शहरामध्ये लपून-छपून चालणाऱ्या अवैध धंद्यांवरही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येणार आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ,अरविंद भिंगारदिवे,शंकर चौधरी,उमेश मोरे,उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर,दिगंबर कारखिले,सुनील दिघे,अक्षय भोसले,अमोल कांबळे,शुभम लगड यांनी केली आहे.