विशेष पोलीस पथकाचा ‘त्या’ कुंटणखान्यावर छापा..पिडीत १७ महिलांची सुटका करण्यात यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एकूण १७ पीडित महिलांची सुटका केली आहे.याबाबत चार जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१७) जून रोजी रात्री दहा वाजता केली.
यावेळी पोलिसांनी शबाना सय्यद पठाण,गणेश लक्ष्मण शिंदे,गणेश अंबादास पाचे,राहुल अरुण गर्जे (सर्व रा. शेवगाव,जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.विशेष पोलीस पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव शहरातील शिवनगर परिसरात अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक बनून छापा टाकला.या कारवाई १७ पीडित महिलांची सुटका करण्यात असून पोलीस गीतांजली विजय पाथरकर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुंदरडे,महिला पोलीस कल्पना गावडे,प्रियांका हरिदास निजावे, सविता शिंदे,राहुल आठरे,भरत अंगरखे,राहुल गुंजाळ,दिनेश मोरे,शंकर चौधरी,दिगंबर कारखिले,मल्लिकार्जुन बनकर, अक्षय भोसले,सुनील पवार यांनी केली.