स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..गॅस गोडाऊन फोडून टाक्या चोरणारे निष्पन्न..धाराशिव मधून एकास ठोकल्या बेडया
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे गॅस गोडाऊनच्या घरफोडी गुन्हयातील 9 आरोपीची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निष्पन्न करून धाराशीव जिल्ह्यातून येथून 1 आरोपी 5 लाख 20,000/- रू.किंमतीचे 130 गॅस टाक्यासह ताब्यात घेण्यात पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.10 जून 2025 रोजी फिर्यादी नामे सुनिल अंकुशराव बेळगे (वय 34,रा.पाथर्डी, ता.पाथर्डी यांचे चिंचपूर इजदे) येथील भारत गॅस कंपनीचे मोहटादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपीतांनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्या.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.640/2025 बीएनएस कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 640/2025 प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे राजेंद्र गुलाब काळे, (रा.कासारखानी,ता.वाशी, जि.धाराशीव) याने त्याचे साथीदारासह केला असून ते वाशी,ता.वाशी, जि.धाराशीव गावचे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने मिळालेल्या माहितीतील ठिकाणी जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेत असताना,आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागला.पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे 2)सुंदर शंकर शिंदे, रा.दसमेगाव, ता.वाशी, जि.धाराशीव (फरार) 3) रामा सुबराव काळे (फरार) 4) गुलाब गुंपूर काळे (फरार) 5) सुनिल लगमण पवार (फरार) 6) दत्ता लगमण पवार ( फरार) 7) लगमण भिसराम पवार (फरार) 8) शंकर सुरेश काळे (फरार) अ.क्र.3 ते 8 रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव 9) माणीक गुलाब काळे, रा.कासार खानी, ता.वाशी, जि.धाराशीव (फरार) अशांनी मिळून सुनिल लगमण पवार याचे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच-14-सीव्ही-1212 व रामा सुबराव काळे याचे सहाचाकी ट्रक क्रमांक माहित नाही अशी वाहने घेऊन मागील दहा दिवसापुर्वी पाथर्डी तालुक्यातील एक गॅस गोडावूनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती सांगीतली. पथकाने गुन्हयात चोरलेल्या गॅस टाक्याबाबत आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरलेल्या गॅस टाक्या या राहुल हनुमंत चेडे, (रा.शिवाजीनगर,वाशी, ता.वाशी, जि.धाराशीव) याचेकडे ट्रक खराब झाल्याने त्याचे हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती सांगीतली.पथकाने राहुल हनुमंत चेडे, वय 38, रा.शिवाजीनगर, वाशी, ता.वाशी,जि.धाराशीव यास गॅस टाक्या हजर करणेबाबत कळविले.पथकाने पंचासमक्ष राहुल हनुमंत चेडे याने हजर केलेल्या 5,20,000/- रूकिंमतीच्या 130 भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग,श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,सुरेश माळी,मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे,ज्ञानेश्वर शिंदे,गणेश लोंढे,संतोष लोढे, गणेश धोत्रे,अरूण गांगुर्डे, फुरकान शेख,हृदय घोडके, सोमनाथ झांबरे,विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ,बाळसाहेब गुंजाळ,रोहित येमुल,रमिझराजा आत्तार,सुनिल मालणकर, भगवान थोरात,आकाश काळे, अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे,जालींदर माने,बाळसाहेब खेडकर, प्रशांत राठोड, सागर ससाणे,भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे व अरूण मोरे यांनी केलेली आहे.
