गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणारे सहा जण ताब्यात तर कला केंद्राच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल SP..विशेष पोलीस पथकाची कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.नमुद आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.संतोष खाडे हे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान ०६ इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-१२२ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे खालीलप्रमाणे.
१)गणेश प्रभाकर चव्हाण, वय-२९ वर्षे, रा. सावरगाव मारुती,ता. जामखेड जि. अहिल्यानगर,२) स्वप्निल नामदेव थोरात, वय-४० वर्षे, रा. सावरगाव मारुती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर,३) शुभम सुर्यभान चव्हाण, वय-२४ वर्षे, रा. सावरगाव मारुती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर,४) देविदास रावसाहेब पवार, वय-३५ वर्षे, रा.लेनवाडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर,५) सत्यजित भागवत शेंडगे, वय-२१ वर्षे, रा. गेवराई जि.बीड,६)आदित्य रामप्रसाद गजमल, वय-२३ वर्षे, रा. निमगाव ता. गेवराई जि. बीड
तसेच रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना जामखेड-बीड रोडवर स्वराज कला केंद्र हे शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ चालु असल्याचे दिसुन आल्याने हॉटेल मॅनेजर यास ताब्यात घेवुन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-३३ (W), १३१ प्रमाणे कारवाई केली.सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, अहिल्यानगर शहर विभाग, पोसई/राजेंद्र वाघ,पोहेकॉ/शंकर चौधरी,पोहेकॉ/अजय साठे, पोहेकॉ/मल्नीकार्जुन बनकर, पोहेकॉ/दिगंबर कारखिले, पोहेकॉ/उमेश खेडकर,पोकॉ/सुनिल दिघे,पोकॉ/अमोल कांबळे,पोकॉ/संभाजी बोराडे यांचे पथकाने केली असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहेत.
