अंमली पदार्थ…अफुच्या पावडरची विक्री करणारा ताब्यात नगर तालुका पोलिसांची धडक कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील साकत शिवारातील सोलापूर हायवे च्या बाजुला हाँटेल पंजाबी ढाबा या ठिकाणी अफुच्या पावडरची विक्री करणाऱ्या इसमास नगर तालुका पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.दि.19 जून 2025 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.प्रल्हाद गिते यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की साकत शिवारातील सोलापुर हाय-वे च्या बाजुला हाँटेल पंजाबी ढाबा या विकाणी अफुच्या पावडरची विक्री होत आहे.

अशी माहीती मिळाल्याने सदरची माहीती तात्काळ त्यांनी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना पत्राव्दारे कळवुन दोन पंच व वजनकाटा धारक यांना बोलावुन पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमध्ये एक इसम नामे चंद्रकांत रघुनाथ शेळके (वय 57 वर्षे रा.गुणवडी ता.जि अहिल्यानगर) असा दिसुन आला त्याला पोलीस पथकाने आपली ओळख सांगुन हॉटेलची झडती घेतली असता त्याच्याजवळ अफूची पावडर अमली पदार्थ नशेसाठी स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी विक्री करत असतांना तो मिळुन आला त्याच्या ताब्यात 940 ग्रॅम अफुची पावडर किंमत अंदाचे 10,000/-रु किंमतीची मिळुन आल्याने जागीच वजन करुन पंचासमक्ष जप्त केली.

सदर इसमास पुढील कार्यवाहीसाठी नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रल्हाद गिते,पोउपनि.पंतगे,पोउपनि.भरत धुमाळ,पोहेकॉ.बाबासाहेब खेडकर,पोहेकॉ.शरद वाढेकर, मपोना.गायत्री धनवडे,मपोकॉ. सोनाली देशमुख,पोकॉ.सागर मिसाळ यांनी केली आहे.या बाबत एन.डी.पी.एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि.भरत धुमाळ हे करीत आहे.
