कोतवाली पोलिसांची धडक कारवाई…लाखो रुपयांचा गांजा हस्तगत..परराज्यातील आरोपीसह स्थानिक खरेदीदार जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दि.19 जून रोजी रात्री कोतवाली पोलीसांना एक 14 टायर मालट्रक गाडीमधून संभाजीनगर कडून केडगाव बायपास परिसरात एक इसम हा गांजा हा अंमली पदार्थ अहिल्यानगर शहराचे बाजूला असणाऱ्या स्थानिक खरेदीदार लोकांना वितरीत करण्याकरिता येत असून तो त्यांचे ताब्यातील गाडीमध्ये उडीसा राज्यातून गांजाचा माल घेवून येत आहे.अशी असल्याचे खात्रीलायक माहिती समजल्याने पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांनी तात्काळ श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांना बातमीची माहीती देवुन त्यांचेकडुन छापा कारवाईची परवानगी घेतली.श्री. अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी स्वःत छापा कारवाई कामी हजर होवून अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बातमीची हकीकत समजावून सांगितली,पोलीस अधिकारी व अंमलदार असे छापा कारवाई कामी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन छापा कारवाई कामी आवश्यक लागणारे साहित्य साधने,लेपटॉप सह केडगाव परिसरात शासकीय तसेच खाजगी वाहनाने रवाना झाले.
केडगाव बायपास रोडवरील असलेल्या टोलनाक्यापासुन जवळ असलेल्या भारत केंद्र वाहन शोरुम जवळ पोलीसांना वेगवेगळ्या पथकांत विभागून अंधाराचा फायदा घेवून दबा धरुन बसण्यास सांगितले. मिळालेल्या बातमीप्रमाणे एक मालट्रक संशयास्पदरित्या टोलनाका पास करुन पुढे येताना दिसला.तो मालट्रक मिळालेल्या बातमीतील वर्णनाप्रमाणे मिळताजुळता असल्याचे निदर्शनास आल्याने त्यातच अंमली पदार्थ गांजा असणार याबाबत संशय बळावला पोलीस पथकाने मालट्रक थांबवून ट्रकचालकास विचारपुस करित असता ट्रकचालक व त्यांचे सोबत मालट्रकचे केबीन मध्ये बसलेले इतर दोघे इसम हे गडबडून जावून तेवून निसटण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना विश्वासात घेवून त्यांची नावे पत्ता विचारली तसेच त्यांचे गाडीचे झडतीचा उद्देश समजावून सांगुन त्यांचे मालट्रक वाहन नं. एम.ए. 16. सी. जी.0452 या गाडीची झडती घेतली असता तिचे पाठीमागील बाजूस लोखंडी पोल अंगल असल्याचे दिसुन आले परंतु त्यानंतर ट्रकचे कैन्बीन व वरच्या बाजूला पोलीस अंमलदार यांनी पंचासमक्ष जावून पहाणी केली असता केबीनचे वर पांढ-या रंगाच्या एकून 4 गोण्या बाडदानाखाली व्यवस्थित झाकलेल्या असलेल्या स्थितीत मिळून आल्या त्या गोण्यांमध्ये खाकी रंगाचे चिकट टेप मध्ये व्यवस्थितरित्या साधारण बीटाच्या आकाराचे पॅकबंद केल्याचे दिसून आले.सदर मालाबाबत विचारणा केली असता ट्रक चालक संतोष प्रकाश दानवे, रा. वाळवणे, ता. पारनेर, जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यात गांजा असल्याचे सांगून तो बहिरमपुर,उडीसा राज्यातून आणलेला असल्याचे सांगून तो गांजा माल घेण्यासाठी काही लोक टोलनाक्यापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेत येणार असून ते मोबाईलवरुन संपर्क असलेबाबत माहीती दिली पोलीस अधिकारी यांनी सदर छापा कारवाईचा ई साक्ष पंचनामा चालु केला.दरम्यान ट्रक चालकचे फोनवर एका इसमाचा फोन आला तो समोरुन ट्रक चालकास तुम्बी टोलनाक्याचे जवळ यायला किती वेळ आहे आम्ही माल घ्यायला कधी येऊ अशी विचारणा करु लागला. त्यावेळी श्री अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी प्रसंगावधान राखत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना काही सूचना केल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी ट्रक चालकास समोरच्या इसमागो मोबाईल फोनवर व्यवस्थित बोलुन त्याला मालट्रकचा नंबर देवून सदर ठिकाणी गांजा माल घेण्याकरिता येण्याबाबत कळविण्यास सांगितले. एका बाजुला वाहनाचे आडोशाला मुद्देमाल जप्ती पंचनामा बामकाज चालु असताना अतिरिक्त पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणाचे आजुबाजूला काही अंतरावर अंधाराचा फायदा घेवुन दबा धरुन बसण्यास सांगितले.
सदर ठिकाणी काही वेळात एक लाल रंगाची स्वीफ्ट चारपाकी गाड़ी नं. एम. एस. 16. सी. की. 2786 व काळ्या रंगाची होंडा सिटी चारचाकी कार नं. एम.एच. 12. सी.दी.11.27 अशी दोन वाहने आली. सदर वाहनातील इसम मालट्रकची नंबरवरुन खात्री करित असताना त्यांना काही कळण्याचे आत अंधारात दबा धरून बसलेल्या साधे वेषातील पोलीसांनी दोन्ही चारचाकी वाहने व त्यात बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले. सदर वाहन चालक व त्यातील इतर इसम हे अंधारातुन पळून जाण्याचा प्रयान करित होते परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक दराडे यांनी आधीच पोलीस कुमक वाढविल्याने नमूद इसमांना पोलीसांचे तावडीतून सुटणे शक्य झाले नाही व सर्व अलगद पोलीसांच्या ताब्यात पकडले गेले.कोतवाली पोलीसांनी गांजा वितरीत करण्याकरिता आलेल्या मालट्रक वाहन नं.एम.एच.16.सी.जी. 0452 मधील एकून 3 अरोपीतांसह गांजा हा नेण्याकरिता दोन चारचाकी वाहनातून आलेल्या एकून असे दोन्ही मिळून एकून 10 आरोपी इसमांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे 1) संतोष प्रकाश दाणावे, वय 40 वर्षे, रा. वाळवणे, ता. पारनेर, किल्ला-अहिल्यानगर, 2) गणेश बापू भोसले, वय 25 वर्ष, रा. जवखेड खालसा, ता. पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, 3) प्रशांत सुरेश मिरपगार, वय 25 वर्षे, रा. कामत शिगये, ता. पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, 4) प्रदिप बापू डहाणे, यय 29 वर्षे, रा. पिंपळगाव लांडगा, ता. जिल्हा अहिल्यानगर, 5) भगवान संजय डहाणे, वय 21 वर्षे, रा. पिंपळगाव लांडगा, ता. वित्ता अहिल्यानगर, १) संदिप केशव बाग, वय 29 वर्षे, रा. लेद्रीमाल, जिल्हा बेथ राज्य उडोसा, 7) दिलीप माखनो भेसरी, वय 30 वर्षे, रा. घुडाधार, जिल्ला बेनिका, राज्य उडीसा, ४) अक्षय बापू डहाणे, वय 25 वर्षे, रा. पिंपळगाव लांडगा, ता. जिल्हा-अहिल्यानगर, 9) प्रमोद सुहास क्षेत्रे, वय 29 वर्षे, रा. आलमगीर, भिंगार, ता. जिल्हा अहिल्यानगर, 10) ईश्वर संतोष गायकवाड, वय 26 वर्षे, रा. पिंपळगाव लांडगा, ता. जिल्हा अहिल्यानगर अशी असून त्यांचे ताब्यातून 19,90,000/- रु किमतीचा अंमली पदार्थ गांजासह, तीन वाहने, मालट्रक मधील लोखंडी पोल अंगल, 11 मोचाईल असा एकून 88,00,000/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई दि. 19/06/2025 रोजी रात्री 10.40 वा. सुरु होवून दि. 20/06/2025 रोजी पहाटे 04.00 वा. पावेतो चालू होती. बर नमुद आरोपीतांचे व्यरितिक्त आणखी एक उडीसा राज्यातील गांजा वितरक इसमाचे नाथ पोलीसांनी निश्ान्न वेलेले असून वर नमूद एकुन 11 11 आरोगी इसमांचे विरुद कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गुरनं. 574/2025 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (4) (2) (क), 29 प्रमाणे दि. 20/06/2025 रोजी सकाळी 06.59 वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. कुणाल सपकाळे हे करित आहे. सदर गुन्याचा वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सखोल तपास करण्यात घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,स.पो.नि. कुणाल सपकाळे,पो.उप.निरी. शितल मुगडे,स.फो. बोडखे, म.पो.हे.कॉ.रोहिणी दरंदले, पो.हे.करें.राजेंद्र ओटी,सचिन मिरपगार, गणेश चक्षाण, रहुल शिंदे, संदिप पितळे, पोकॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.कॉ. सुरज कदम, सचिन लोळगे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राम हंडाळ, संकेत धिवर, सोमनाथ राऊत, बाळासाहेब ढाकणे, अर्जुन फुंदे, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे यांनी केली आहे.