अहमदनगर प्रतिनिधी (दि ४ फेब्रुवारी):-सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार असुन लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असुन एमआयडीसी येथील स्नेहालय येथे उद्योजक राजेंद्र गायकवाड यांच्या कन्या कु.शिवण्या गायकवाड हिने आपल्या साठवलेल्या पैशातून वायफट खर्च न करता गोरगरीब निराधार वंचितांसमवेत सामाजिक उपक्रमाची बांधिलकी जपून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी उद्योजक राजेंद्र गायकवाड, वडगाव आमली ग्रामपंचायतचे सदस्या सौ.आशा गायकवाड,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सीताबाई गायकवाड, शिवाजी डोरे गुरुजी,राहुल तिवारी,अनिल भिडे,संकेत खामकर,विक्रांत म्हस्के, प्रमोद कुमार गुळभेले आदी उपस्थित होते.उद्योजक राजेंद्र गायकवाड म्हणाले की, मुलीने साठवलेल्या पैशातून कुठलीही भेटवस्तू न घेता सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब अनाथ निराधार वंचितांसमवेत सामाजिक उपक्रम या हेतूने स्नेहालयातील विद्यार्थ्यांसमवेत सामाजिक उपक्रम साजरा करून खाऊचे वाटप करण्यात आले. आम्हाला व परिवाराला खूप आनंद होत आहे.
