श्रीरामपूर शहरातील गुटखा व तंबाखु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहरातील गुटखा व तंबाखु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीकडून 1 लाख 24,334/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.25 जून 2025 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना,पथकास गोपनीय माहिती मिळाली की,श्रीरामपूर शहरात बीफ मार्केट येथे तारा पान कॉर्नर पान टपरीमध्ये गुटखा पानमसाल्याची व सुगंधीत तंबाखुचा साठा करून विक्री चालु आहे.
पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता तारा पान कॉर्नर दुकानामध्ये बसलेला इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)मुजम्मिल रफिक कुरेशी (वय 33,रा.कुरेशी जमात खाना,वॉर्ड नं.02,श्रीरामपूर ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगीतले.पथकाने घटना ठिकाणावरून 1,24,334/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यात विमल पानमसाला,व्ही-1 तंबाखु पुडया, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, शॉट 999 तंबाखु,हिरा पानमसाला,महा रॉयल 717 तंबाखु,एक मोबाईल व सुझुकी कंपनीची मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे पान स्टॉलच्या मालकीबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा पान स्टॉल त्याचे व त्याचा भाऊ 2)आजम रफिक कुरेशी,रा.कुरेशी जमात खाना, वॉर्ड नं.02, श्रीरामपूर (फरार) यांचा असून ते दोघे मिळून चालवत असल्याची माहिती सांगीतली.नमूद आरोपी विरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 615/2025 बीएनएस 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3 (5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर,श्री. बसवराज शिवपुले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे,गणेश धोत्रे,रणजीत जाधव, भगवान थोरात,रमीजराजा अत्तार यांनी केलेली आहे.