दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली परराज्यातील टोळीस कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली परराज्यातील टोळीस जेरबंद करण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.दि.25 जून 2025 रोजी मध्यरात्री 03.00 वा.चे सुमारास रात्रगस्त पेट्रोलिंग अधिकारी म.पो.उप.निरी.शितल मुगडे यांना रात्रगस्त दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,माळीवाडा वेशी जवळ,अहिल्यानगर येथे अंगात काळे रंगाचे कपडे घातलेले एकुन 5 संशयीत इसम हे कोठेतरी चोरी करण्याचे उद्देशाने रात्रीचे अंधाराचा फायदा घेवून एकत्रीत थांबलेले आहे.त्याबाबत त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांना माहीती देवून त्यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी जावुन मध्यरात्री 03.25 वा.कारवाई केली.
सदर ठिकाणी 5 इसम हे त्यांचे ताब्यात दरोड्याकरिता लागणारे साहित्य साधनांसह मिळुन आले त्यातील तीन इसमांना जागीच पक़ण्यात आले परंतु 2 इसम रात्रीचे अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. म.पो.उप.निरी.शितल मुगडे पकडलेल्या तिघा इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नावे 1)गोलुसिंग नसिबसिंग पटवा उर्फ सिकलीगर,वय 22 वर्षे, रा. पाचोली,ता.खकनार,जिल्हा बुरानपुर, मध्यप्रदेश राज्य 2) पातालसिंग दिलीपसिंग सिकलीगर,वय 20 वर्षे, रा. एकता नगर, नलवा रोड, नंदुरबार, महाराष्ट्र राज्य, 3) आकाशसिंग कैलाससिंग सिकलीगर, वय 19 वर्षे, रा. बीआरसी गेट,उदना प्रभु नगर, सुरत, गुजरात राज्य असे असल्याचे सांगितले.तसेच पळुन गेलेल्या दोन इसमांचे नावाबाबत विचारपुस केली असता त्यांनी माहीती दिली नाही.म.पो.उप.निरी. शितल मुगडे यांनी पंचासमक्ष पकडलेल्या अ.नं.1 ते 3 यांची पोलीस स्टाफच्या मदतीने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन 10,200/- रु किं.चा मुद्देमाल एक काळे रंगाची बॅगेत ठेवलेला असलेला त्यात तीन मोठे स्क्रू ड्रायव्हर त्याला हिरव्या रंगाच्या मुठी त्यावर पिवळ्या रंगात अनुक्रमे TAPARIA 929, TAPARIA 829, TAPARIA 824 असे छापलेले असलेले, एक साधारण 19 इंच लांबीची लोखंडी कटावनी दोन्ही बाजुला निमुळती चपटी असलेली व एका बाजुला वळलेली असलेली, दोन छोट्या बॅट-या त्यातील एक काळे लाल रंगाची त्यावर ROS छापलेले व दुसरी निळे रंगाची त्यावर EVEREADY असे छापलेले असलेली, एक लोखंडी नट खोलण्याचा पान्हा त्यावर BHOLA 200 MM 8″ DROP FORGED HEAVY DUTY असे छापलेले असलेले, एकुन 6 नग कात्रीचे सिंगल भाग त्यातील दोन निळे, दोन लाल, दोन पिवळे रंगाच्या असलेल्या, दोन काळे रंगाच्या कानटोप्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत सरकारतर्फे कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गु.र.नं. 586/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5) प्रमाणे दि. 25/05/2025 रोजी 07.28 वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे तपासात आरोपी अ.नं. 1 ते 3 यांना अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने त्यांची दि. 27/06/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. गणेश बाळासाहेब देशमुख, कोतवाली पो.स्टे.हे करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,म.पो.उप. निरी.शितल मुगडे,पो.उप.निरी. गणेश बाळासाहेब देशमुख, स.फौ.संभाजी कोतकर,अशोक सरोदे,पो.हे.कॉ.संदिप पितळे, योगेश कवाष्टे,म.पो.हे.कॉ.शोभा कुरुळे,पो.कॉ.अमोल गाडे, अतुल काजळे,संजय काळे, किरण बडे,म.पो.कॉ. श्वेता परमासागर यांनी केली आहे.