आंध्रप्रदेशात अर्थिक फसवणूक करणारा नगर येथील आरोपी तोफखाना पोलीसांच्या ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आंध्रप्रदेश राज्यात अर्थिक फसवणूक करणारा अहिल्यानगर येथील आरोपी तोफखाना पोलीसांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात आला आहे.मंगलागिरी पोलीस स्टेशन राज्य आंध्रप्रदेश येथील गु.रजि. नंबर १०/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३१८ (४),३१८ (२), ३५१ (२), १११ सह आय.टी. अॅक्ट २००८ चे कलम ६६,६६ (सी), ६६ (ड) हया क्रिप्टो करन्सी फसवणुकीच्या गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आंध्र प्रदेश हे करत होते.
त्यांनी नमुद गुन्हयातील फरार आरोपी अभिजीत संजय वाघमारे (रा. अहिल्यानगर) याचा शोध घेणे कामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे येवून मदतीची मागणी केल्याने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तोफखाना पोलिसांचे एक पथक आंध्रप्रदेश येथुन आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सोबत रवाना केले होते.या पथकाने नमुद गुन्हयातील -आरोपी अभिजीत संजय वाघमारे (वय ३१ वर्ष रा.विराज कॉलनी अहिल्यानगर) हा पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यास तात्काळ ताब्यात घेवुन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आंध्रप्रदेश चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात दिले.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी न.श.वि.अ.श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांचे सुचने प्रमाणे, पोहेकॉ/अब्दुलकादर इनामदार,पो.कॉ/सुजय हिवाळे, पोकॉ/महेश पाखरे,पोकॉ/शफी शेख यांच्या पथकाने केली आहे.