महेर इंग्लिश स्कूलमध्ये ‘महास्कील’ तर्फे कॅलिग्राफी साहित्य वाटप..डिजिटल जगात अटेन्शन स्पॅन वाढविण्यासाठी कॅलिग्राफी शिकणे काळाची गरज-राहुल बांगर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डिजिटल युगात स्क्रीन पाहण्यामुळे मुलांचा अटेन्शन स्पॅन अर्थात एकाग्रता कमी होत आहे,काही विद्यार्थ्यांना अगदी एक मिनिटेही स्थिर ठेवणे पालकांसाठी आव्हान झाले आहे.या समस्येला सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवून त्यांना लेखन कलेची आवड निर्माण करणे आवश्यक आहे.या लेखन कलेतील कलात्मक विषय म्हणजेच कॅलिग्राफी होय. कॅलिग्राफीच्या माध्यमातून मुलांची एकाग्रता वाढते,हे लक्षात घेऊन हिंदसेवा मंडळाचे मेहर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुरिता झगडे यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास कॅलिग्राफी हा विषय सुरू केला आहे.या अभिनव उपक्रमाचे महास्कील संस्थेच्या वतीने कौतुक करून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत कॅलिग्राफी लेखन साहित्य वाटप करण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कलात्मक गुणांना वाव मिळून त्यांची अटेन्शनस्पॅनची समस्या दूर होऊन ते एक सर्जनशील नागरिक बनतील असा आशावाद महास्कील संस्थेचे संचालक राहुल बांगर यांनी व्यक्त केला.

नगर शहर परिसरात हिंद सेवा मंडळाचे मेहेर इंग्लिश स्कूल नेहमी अभिनव उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असते,ठराविक विषयातील तज्ञांना बोलवून विध्यार्थी अक्षर समजून घेऊन त्यानुसार त्यांच्या स्वभावातील समस्या हेरण्यासाठी मानस शास्त्रीय वर्ग देखील घेण्यात येतात आणि पुढेही शाळा विकासासाठी असे आणखी अभिनव उपक्रम घेणाचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुरिता झगडे यांनी केले.या प्रसंगी हस्ताक्षरतज्ञ साक्षी मुनोत देखील उपस्थित होत्या,त्यांनी विद्यार्थ्यांना कॅलिग्राफी विषयातील करियर संधीबाबत मार्गदर्शन केले.लहान वयात कॅलिग्राफी शिकण्याने मुलांचा मानसिक तणाव कमी होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो.या उपक्रमाला शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षराची आवड निर्माण करणे,लेखन कलेचा प्रसार करणे आणि एकाग्रता वाढवणे हा होता.कॅलिग्राफी शिकण्याने विद्यार्थ्यांना कौशल्य स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात उपयोगी होईल, असे अध्यक्षीय भाषणात दीपक शिंदे सर यांनी नमूद केले.त्यांनी सांगितले कि,सुंदर लेखन ही फक्त कला नाही,तर आत्मविश्वास वाढवणारे शस्त्र आहे.कॅलिग्राफीचा सराव केल्यानेविद्यार्थ्यां चेहस्ताक्षर आकर्षक बनते आणि त्यांची व्यक्त होण्याची क्षमता सुधारते.कॅलिग्राफी साहित्य मिळाल्याने विद्यार्थी अतिशय आनंदी झाले. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त करताना “आता आम्ही नियमितपणे लेखनाचा सराव करून शालेय उपक्रमांमध्ये भाग घेऊ,” असे सांगितले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना या संधीचा योग्य फायदा करून घेण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी महेर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘महास्कील’ संस्थेचेआभार मानले.त्याच प्रमाणे शहरातील इतर गरजूविद्यार्थ्यना मदत करण्यासाठी संस्थेच्या 9011193700 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महास्कील संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक अभिजित चिंतामणी यांनी केले.यावेळी कार्यक्रम समन्वयक संगीता वल्लाकट्टी,सत्यश्री चिल्का,विमल आवारे,भारती खांडेकर,आशा घोरपडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका उषा भालेराव यांनी केले.या उपक्रमाला महास्कील संस्थेचे सहसंस्थापक तेजल कांबळे,शाळेचे चेअरमन जगदीश झालानी तसेच हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष,मानद सचिव,कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या.
