शिंगवे नाईक ग्रामस्थांचा संभ्रम दूर प्रत्यक्ष चोरांना पकडून एमआयडीसी पोलिसांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम केली हस्तगत…जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम मंदिर व्यवस्थापनाला केले परत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदीर, भैरवनाथ मंदीर,सावता महाराज मंदीरामध्ये चोरी करणा-या तिन सराईत आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून १ लाख ०३,०००/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत करुन तिन दिवसाच्या आत सदरचा मुददेमाल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे हस्ते मंदिर व्यवस्थापनाला परत करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी नामे विवेक लक्ष्मण शिंदे (वय ४४ वर्ष रा.शिंगवे नाईक ता. जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की,दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदीर,भैरवनाथ मंदीर,सावता महाराज मंदीराचे कुलूप तोडुन दरवाजा खोलुन मंदीरातील मुर्तीवरील चांदीचे मुकुट,सोन्याची नथ,बिंदी, सोन्याचे मंगळ सुत्र,०२ पंचधातुचे मुकुट व ५०,०००/- रु.रोख रक्कम असा एकुण १,३३,०००/- किंमतीचा मुद्देमाल तसेच सावता महाराज मंदीर येथे तोडफोड करुन नुकसान केले आणि भैरवनाथ मंदीरातील दानपेटी फोडून १५००-/ रु. चोरट्याने चोरुन नेले वैगरे मजकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.रजि. नंबर ७०४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४), ३०५ (ए), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शिंगवे नाईक येथील गावकरी व भाविक यांचेमध्ये प्रचंड नाराजी व जनक्षोभ निर्माण झाला होता. यातूनच सदर चोरीचा तपास तात्काळ लावण्याचे आव्हान एम.आय.डी.सी. पो.स्टे. पुढे निर्माण झाले होते.सदर चोरीचा तपास जलदगतीने करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी पोलिसांना सुचना व मार्गदर्शन केले होते.

त्या दरम्यान सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी.चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे किशोर तुकाराम बर्डे रा. वरंवडी ता.राहुरी जि. अहिल्यानगर याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असुन तो सध्या मुळाडॅम परीसरात असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी मुळा डॅम परीसरात जावुन सापळा रचुन यातील सराईत आरोपी नामे किशोर तुकाराम बर्डे रा.वरंवडी ता.राहुरी जि.अहिल्यानगर यास पकडले.त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता,त्याने शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदीर,भैरवनाथ मंदीर व सावता महाराज मंदीर येथे चोरी केल्याची कबुली दिली व सदर चोरी त्याचे साथीदार सागर गणपत बर्डे वय ३२ वर्ष मुळानगर ता.राहुरी.जि. अहिल्यानगर,संजय बबन बर्डे वय-३२ वर्ष रा.मुळानगर मुळा डॅम ता.राहुरी.जि.अहिल्यानगर यांचे मदतीने केली असुन ते राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरुन वरील दोन्ही आरोपींना राहुरी येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे किशोर तुकाराम बड़े वय-३० वर्ष रा. एकलव्य वस्ती वरंवडी ता. राहुरी जि अहिल्यानगर, सागर गणपत बर्डे वय-३२ वर्ष मुळानगर ता. राहुरी जि अहिल्यानगर,संजय बबन बर्डे वय-३२ वर्ष रा.मुळानगर मुळा डॅम ता.राहुरी जि अहिल्यानगर यांना अटक केली असुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरी केलेले देवाचे सोन्याचे मणी, चांदीचे मुकुट, मोबाईल असा एकुण १,०३,०००/-रु रुपयाचा मुददेमाल हस्तगत केला असुन सदरचा मुददेमाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.घार्गे यांचे हस्ते देवाचे दागिने व मुकुट श्रीराम मंदीर व्यवस्थापक शिंगवे नाईक यांचे ताब्यात देण्यात आला आहे.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.शिरीष वमने यांचे मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलीस ठाणे सपोनि.माणिक बी.चौधरी,पोसई/मनोज मोंढे,सफौ/राकेश खेडकर,पोहेकॉ/संदीप पवार, पोहेकॉ/राजु सुद्रीक,पोहेकॉ/ सचिन आडबल,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/नवनाथ दहिफळे, पोकॉ/ज्ञानेश्वर आघाव,पोकॉ/ जयशिंग शिंदे,पोकॉ/सुरज देशमुख,पोकॉ/हरदास तसेच दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगर चे पोकॉ/राहुल गुंडु यांनी केली आहे.
