ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबीरात दोनशे रूग्णाची तपासणी
देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-भिडी येथील सार्वजनीक आरोग्य व कूटूंब कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानूसार ९ फेब्रूवारीला ग्रामिण रूग्णालय येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबीराचे उदघाटन सरपंच सचिन बिरे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद कोडापे,डॉ.दिनेश राठोड़, डॉ.अल्केश कवडे,डॉ.कू.अश्विनी जयस्वाल,यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन अधिपरीचारीका कू.शोभा मेढे यानी केले,यावेळी शिबीरात २५० रूग्णाची तपासणी करूण गंभिर आजारी रूग्णाना आंतररूग्ण विभागात ठेवून विना मूल्य त्यांचेवर उपचार करण्यात आले.तर गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामिण रूग्णालय कर्मचारी वृंदा कडून रक्तदान करण्यात आले यामंध्ये वैधकिय अधिक्षक डॉ.कोडापे,वैभव जवजाळ,रोहण कैलासकर, आर.तिवारी,महेश काळे व इतर सामाजिक कार्यकर्ते सूनिल खडसे,संचिण शेलूटे,किशोर गेडाम,सूमीत आलोडे,व इतर कार्यकर्त्यानी रक्तदान केले रूग्णाची तपासणी व उपचार डॉ दिनेश राठोड़,अल्केश कवडे,डॉ. कू.अश्विनी जयस्वाल यांनी केले रक्तदान शिबीराचे कार्य डॉ.अभिजीत वाघमारे,प्रयोग शाळा तंत्रज्ञ प्रशांत काकडे, नेहल डहाट,विरेद्र शेंडे,यांनी काम पाहीले शिबीर यशस्वितेसाठी रूग्णालयातील परिचारीका,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.