अहिल्यानगर पोलीस दलात पुन्हा खळबळ..लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात जाळ्यात
अहमदनगर (प्रतिनिधी):-राहता पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार श्री.अनिल रामभाऊ गवांदे याना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.तक्रारदाराकडून गुन्हा नोंद करून देण्यासाठी गवांदे यांनी एकूण २०,००० रुपयांची मागणी केली होती.
त्यापैकी तडजोडीअंती १५,००० रुपयांवर व्यवहार ठरला.तक्रारदाराने लाच देण्याची तयारी दाखवताच २४ सप्टेंबर रोजी लाचलुचपत विभागाशी तक्रारदाराने संपर्क साधून हकीकत सांगितली.२५ सप्टेंबर रोजी ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराने १५,००० रुपये देताच,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून गवांदे यांना रंगेहात पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अजित त्रिपुटे,पोलीस निरीक्षक राजू आल्हाट,पोना.चंद्रकांत काळे,पोकॉ.शेखर वाघ,पोकॉ.किशोर कुळधर,चापोहेकॉ.दशरथ लाड यांनी केली आहे.
