शहरातील पान टपऱ्यांवर गुटखा विक्री..एलसीबी चे विविध ठिकाणी छापे..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील पानटपऱ्यांमध्ये गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याच्या तक्रारींवरून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत ३ गुन्हे दाखल होऊन एकूण ७ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून 17,132/-रू. किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
📌 तक्रारी व आदेश
शहरातील पानटपऱ्यांवर गुटखा विक्रीबाबत प्राप्त तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोनि श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंत सालगुडे व अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
📌 छापे व कारवाई
दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी पथकाने शहरातील विविध भागांमध्ये छापे टाकून गुन्हे दाखल केले आहे.
📌 मार्गदर्शनाखालील पथक
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री.किरणकुमार कबाडी तसेच पोउपनि अनंत सालगुडे,अंमलदार सुनिल पवार, राहुल द्वारके,लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे,भिमराज खर्से,राहुल डोके,रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे यांच्या पथकाने केली.
👉 या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस दलाची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.