अहिल्यानगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :-ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर शनिवारी सकाळी अज्ञात तरुणांनी काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.ही घटना नगर तालुक्यातील आरणगाव शिवारातील बाह्यवळण रस्त्यावर घडली असून हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण हाके हे सकाळी देऊळ नांदूर (ता. पाथर्डी) येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेसाठी निघाले होते. दरम्यान, काही युवकांनी त्यांच्या वाहनाला अडवले आणि अचानक काठ्यांनी वाहनावर हल्ला केला.या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून काचा फोडण्यात आल्या. मात्र, लक्ष्मण हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर ओबीसी समाजात तीव्र संतापाचे वातावरण असून हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.