आई-वडीलच लहान मुलांना चोरीस प्रवृत्त करून घरफोडी करायला लावायचे..मात्र तोफखाना पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई..तब्बल 2,95,000 रू. किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने अल्पवयीन मुलांला चोरीस प्रवृत्त करून घरफोडी घडविणाऱ्या आरोपींना गजाआड करत मोठी कामगिरी केली आहे.या कारवाईत पोलिसांनी 2,95,00/-रू. किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.दि.19/9/2025 रोजी रात्री श्री.सुशीला परशुराम राऊत (रा.सिव्हील हडको अहिल्यानगर) यांच्या घरी अज्ञातांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान उघड झाले की आरोपींनी स्वतःचोरी न करता लहान मुलांना चोरीस प्रवृत्त केले होते.पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करत चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला.
जप्त दागिन्यांचा तपशील :
सोन्याची चैन-१० ग्रॅम
अंगठ्या-३ नग
बांगड्या-२ नग
कानातले-२ जोड
इतर दागिने
एकूण किंमत : 2,95,000-रू.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथकाची भूमिका
ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण,नितीन उगलमुगले, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण अब्दुल इनामदार,सुरज वाबळे, सुधीर खाडे,सुमित गवळी, अविनाश बर्डे,सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे,भागवत बांगर,दादासाहेब रोहकले,सुजय हिवाळे यांनी केली आहे. अधिक तपास प्रवीण खंडागळे हे करीत आहेत.
तोफखाना पोलिसांच्या या कारवाईमुळे अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आला असून, आरोपींनी लहान मुलांचा गैरवापर केल्याने समाजात संताप निर्माण झाला होता. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
