नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा लागला निकाल ..आरोपीस ३ वर्ष तुरुंगवास तर १ हजार रुपये दंडाची न्यायालयाने दिली शिक्षा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 633/2022 भादवि कलम 326, 323,201 तसेच कोर्ट केस नंबर RCC 1772/2022 प्रमाणे दाखल गुन्ह्यात तपासी अंमलदार मपोना/2330 एम.व्ही.कर्डक यांनी गुन्ह्याचा तपास केला होता.
सदरील गुन्ह्याचा निकाल नुकताच लागला आहे.या प्रकरणातील आरोपी भारत उर्फ अर्जुन आसाराम फंड (रा.आगडगाव, ता.जि.अहिल्यानगर) यास न्यायालयाने दि.17/09/2025 रोजी तीन वर्षांची कैद व एक हजार रुपयांचा द्रव्यदंड,तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त कैद अशी शिक्षा सुनावली आहे.या खटल्यात नगर तालुका पोलीस स्टेशनचे कोर्ट ऑर्डली मपोकॉ/1701 रूपाली शेलार यांनी न्यायालयीन कामकाज यशस्वीरित्या पार पाडले.
