विनापरवाना गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कोतवाली पोलिसांची धडक कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गावकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक इसम गुटखा वाहतूक करीत असल्याचे समजले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या विनापरवाना गुटखा व सुपारी तंबाखू यांची अहिल्यानगर शहरात बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने सापळा रचून वाहनासह गुन्हेगाराला पकडले.
या कारवाईत पोलीसांनी दीपक पोपटराव लोखंडे याला ताब्यात घेतले असून वाहनातून सुमारे ३ लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस श्री. दीपक टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख,पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,सहाय्यक फौजदार संतोष बनकर,सुनील शिरसाट,विजय ठोंबरे,सुरज कदम, शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर,सचिन लोळगे,दीपक रोहकले,याकूब सय्यद,संदीप कवळे,अन्न व औषध पुरवठा निरीक्षक श्री.बडे यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास सपोनि.तेजश्री थोरात व पोहेकॉ. संदीप पितळे हे करीत आहे.