धडक कारवाई..अहिल्यानगर पोलिसांचा मोहीमेत मोठा दणका..
अहिल्यानगर (दि.16 ऑक्टोबर):-अहिल्यानगर शहरातील वाहतूक शिस्त मोडणाऱ्या वाहनधारकांवर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा धडक मोहीम राबवून कारवाई केली आहे.शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली “ड्रंक अँड ड्राइव्ह”, विना नंबर प्लेट,फॅन्सी नंबर,विना हेल्मेट तसेच मॉडिफाइड सायलेंसर असणाऱ्या वाहनांवर एकाच वेळी मोठा गंडांतर उडवत मोहिम हाती घेण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे यांच्या आदेशान्वये दि.15 व 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
या काळात कोतवाली,तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ब्लॅक स्पॉट पेट्रोलिंग आणि नाकाबंदी करण्यात आली.या मोहिमेदरम्यान एकूण 120 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 50 हजार 700/-इतका दंड वसूल करण्यात आला.तसेच दोन जणांवर ड्रंक अँड ड्राइव्ह केल्याबद्दल BNS 281 सह MV Act 185 प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.कारवाई दरम्यान अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट,विना नंबर,विना हेल्मेट, आणि अतिशय आवाज करणारे मॉडिफाइड सायलेंसर आढळून आले.अशा नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करून शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
सदर कारवाई डॉ.दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या मोहिमेत कोतवाली पो.नि. संभाजी गायकवाड,तोफखाना पो.नि.आनंद कोकरे,शहर वाहतूक शाखेचे पो.नि.बोरसे,भिंगार कॅम्प पो.स्टे. सपोनि.जगदीश मुलगीर तसेच त्यांच्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांनी उत्साहाने सहभाग घेतला.पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शहरातील अनुशासन मोडणाऱ्या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून या मोहिमेचे कौतुक होत आहे.
