अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर..प्रभाग ९, १५,१६ मध्ये मोठे फेरबदल..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली.९ ते १३ ऑक्टोबर अशी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत असतानाही मुदत उलटूनही ती जाहीर होत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
अखेर आज अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होताच शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.या नव्या रचनेत विशेषतः प्रभाग क्रमांक ९,१५ आणि १६ मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक ठिकाणी सीमारेषांमध्ये तोडफोड झाल्याचे दिसून आले.
