समशेरपूर गटातून ॲड.गणेश खोकले जिल्हा परिषद निवडणूक लढणार!..विकासगंगेला नवी गती देण्याचा निर्धार
अकोले (प्रतिनिधी):- गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील समशेरपूर गटातून जिल्हापरिषद निवडणुकीसाठी ॲड.गणेश खोकले यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.गेल्या काही वर्षांपासून ॲड.खोकले हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी करत होते.
अकोले तालुक्यातील विकासासाठी त्यांनी अनेक सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत.विशेष म्हणजे,आदिवासी समाजातील तरुणांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. खोकले हे समरोशपूर गटाच्या सर्वांगीण विकासाचे आपले ध्येय पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.विकासगंगा समशेरपूरमध्ये आणण्यासाठी मी जनतेचा आशीर्वाद घेऊन निवडणूक लढवणार आहे.जनतेचे आशीर्वाद लाभले,तर तालुक्याच्या विकासात आमूलाग्र बदल घडवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ॲड.खोकले यांनी यापूर्वी विविध पदांवर काम करून अनुभव घेतला आहे.महाराष्ट्र राज्य विधिमंडळ समितीचे सदस्य, आदिवासी संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष तसेच विविध सामाजिक संस्थांशी निगडित असून अनेक उपक्रमांतून त्यांनी जनतेशी घट्ट नातं जोडलं आहे.त्यांच्या कार्यकाळात आरोग्य आणि जनजागृती अभियान, वृक्षलागवड,आदिवासी शैक्षणिक उपक्रम,सांस्कृतिक सणोत्सव आणि धर्मिक सोहळ्यांचे आयोजन हे सर्वांगीण विकासाचे उदाहरण ठरले आहे.त्यांनी मतदारसंघातील सुमारे ५० टक्के तरुण मतदारांशी थेट संवाद साधून,त्यांना शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प केला आहे.समशेरपूर गट माझं कुटुंब आहे,आणि या कुटुंबाच्या विकासासाठी माझं संपूर्ण आयुष्य अर्पण करणार असल्याचे ॲड. गणेशा खोकले यांनी सांगितले. समशेरपुर गटातून तरुण तडफदार ॲड.गणेश खोकले हे जिल्हापरिषदेची उमेदवारी करणार असल्याचे तरुणांना समजल्याने तरुणांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
