गुन्हेगारी रेकॉर्ड..प्राणघातक हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली संगमनेर पोलिसांची थरारक मध्यरात्री कारवाई!
संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):- संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धाडसी कारवाईत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीचा मोठा कट उधळून लावत चौघा दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. एका आरोपीने मात्र अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पकडलेल्या सर्व आरोपींवर पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.गुरुवारी (२३ ऑक्टोबर) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख नेतृत्वाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत,उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे,पोलीस अंमलदार बाबासाहेब सातपुते,रामकिसन मुकरे,विजय खुळे,विजय आगलावे,सागर नागरे,आत्माराम पवार,हरिश्चंद्र बांडे,संदीप कोंदे यांनी ही धडक कारवाई केली.
📍पकडलेले आरोपी :
निखिल विजय वाल्हेकर (२४, रा. वेल्हाळे, संगमनेर)
अनिकेत गजानन मंडलिक (२३, रा. माळीवाडा, संगमनेर)
मोहन विजय खरात (१९, रा. घुलेवाडी, संगमनेर)
आदित्य संजय शिंदे (१९, रा. अकोले नाका, संगमनेर)
तर साई शरद सूर्यवंशी (रा. अकोले नाका) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.सर्व आरोपींना न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
🔍 मध्यरात्रीची धडक कारवाई
घुलेवाडी शिवारातील हरीबाबा मंदिराजवळ गस्त घालत असताना पोलिसांना काही संशयास्पद तरुण दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्यांनी शहरात दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे उघड झाले.
🪓 जप्त मुद्देमाल (एकूण किंमत ₹१,६३,०००)
४ मोबाईल फोन (₹८५,०००)
हिरो होंडा मोटारसायकल (₹४०,०००)
ज्युपिटर स्कुटी (₹३५,०००)
एअर पिस्टल, कोयते, लोखंडी हत्यारे, हातोडा, रस्सी, लाल मिरची पूड, लोखंडी गज आदी साहित्य.
⚖️ आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
निखिल वाल्हेकर – ६ गुन्हे
अनिकेत मंडलिक – १० गुन्हे
साई सूर्यवंशी (फरार) – ९ गुन्हे
पोलिसांनी गु.र.नं. ९३९/२०२५ अंतर्गत बी.एन.एस. कलम ३१०(४), ३१०(५) सह शस्त्र अधिनियम २५(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान खान करत आहेत.
